29 March 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; मृतांचे प्रमाण २.८० टक्के

India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली,४ जून : कोरोनाच्या रुग्णांमध्ये बुधवारी सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८,९०९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार, ६१५ झाली आहे. देशातील मृतांची संख्या ५,८१५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे निम्मे म्हणजे १ लाख ३०३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ४,७७६ रुग्ण बरे झाले असून, २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे प्रमाण २.८० टक्के आहे.

मागील चोवीस तासांमध्ये १ लाख ३७ हजार १५८ नमुना चाचण्या घेण्यात आल्या. आता सातत्याने एक लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ४१ लाख ३ हजार २३३ चाचण्या झाल्या आहेत. ४८० सरकारी व २०८ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) दिली. गेल्या काही दिवसांपासून आठ हजारांहून अधिक रुग्णवाढ होत आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात १ हजार २७६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार २६२ वर पोहोचली आहे. तसेच काल ४९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने येथील मुंबईतील एकूण कोरोनाबळींची संख्या १ हजार ४१७ इतकी झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पुणे, पिंपरी आणि परिसरात काल दिवसभरात ३४० नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८ हजार ४७४ इतकी झाली आहे. तर काल ९ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३८३ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: The highest increase was reported Wednesday in corona patients. In the last 24 hours, 8,909 cases of corona have been detected in the country, bringing the total number of patients to 2,07,615. The death toll in the country has reached 5,815. According to figures released by the Union Health Ministry on Wednesday, about half, or 1 lakh 303 patients, have been cured.

News English Title: In the last 24 hours 8909 cases of corona have been detected in the India News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x