14 December 2024 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता भारत काही दिवसात रशियाला मागे टाकणार

India, Covid 19, Russia

 नवी दिल्ली, 02 जुलै : गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. भारतात या आधी रुग्णांची संख्या एक लाख होण्यासाठी ११० दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतर गेल्या ४५ दिवसांत पाच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. covid19india.org ने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७, ७८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दरम्यान, येत्या 5 दिवसांत देश 6 लाखांचा आकडा पार करू शकतो. यानंतर जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश असेल. रशियाला मागे टाकून सध्या चौथ्या क्रमांकावर असलेला भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल.

 

News English Summary: In the next 5 days, the country may cross the 6 lakh mark. After this, India will be the third country in the world in terms of coronary artery disease. India, currently ranked fourth, will move up to third, behind Russia.

News English Title: In the next 5 days the country may cross the 6 lakh mark of covid 19 patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x