14 December 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

गेहलोत यांना मदत केल्याच्या आरोपानंतर वसुंधरा राजे यांची पहिली प्रतिक्रिया

Rajasthan Political Crisis, Congress, Vasundhara Raje, BJP

जयपूर, १८ जुलै : राजस्थान काँग्रेसने हकालपट्टी केलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडावेळी सत्तास्थापनेसाठी चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी राजे यांनीच गेहलोतांना रसद पुरविल्याचा आरोप पायलटांसह एनडीएच्या खासदारानेही केला होता. यामुळे वसुंधरा राजेंना आता बोलावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, राजस्थानातला सत्तासंघर्ष आता कोर्टात पोहचला आहे. सगळं प्रकरण निवळल्यानंतर आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानातल्या काँग्रेसमध्ये झालेलं बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागते आहे ही बाब दुर्दैवी आहे असंही वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

मात्र, वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. बेनिवास यांनी सांगितले की, वसुंधराराजेंमुळेच गेहलोत सरकारची बुडणारी नौका पुन्हा तरंगू लागली आहे. बेनिवाल यांनी या आधीही वसुंधरा राजेंवर कोमतीही भीडभाड न ठेवता आरोप केले आहेत. बेनिवाल यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक ट्विट करत भाजपच्या दिग्गज नेत्या राजस्थानमधील काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी आमदारांना फोन करत असल्याचा आरोप केला आहे.

 

News English Summary: The power struggle in Rajasthan has now reached the courts. Former Rajasthan Chief Minister and BJP leader Vasundhara Raje has now reacted to all this. The revolt in the Congress in Rajasthan is unfortunate for the people.

News English Title:  It Is Unfortunate That The People Of Rajasthan Have To Bear The Brunt Of The Infighting In Congress Say Vasundhara Raje Former Cm Of Rajasthan News latest updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x