25 April 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

मोदींनी फोन केला अन ‘काम की बात’ सोडून फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली' | झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र

Jharkhand CM Hemant Soren

रांची, ०७ मे | दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. त्यांच्या याच ‘मन की बात’वरुन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी चक्क पंतप्रधानांचाच समाचार घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी फोन केला पण ऐकून न घेता फक्त स्वतःचंच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या या ट्विटमध्ये हेमंत सोरेन म्हणतात, “आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं”.

यावेळी झारखंडने कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्र सरकारकडून काडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य सचिव अरुण सिंह यांच्या मते, राज्याला केवळ 2181 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. राज्य सरकार आपल्या स्तरावर बांगलादेशाकडून 50 हजार इंजेक्शन्स मागवू इच्छिते. परंतु केंद्राने अद्याप मंजुरी दिली नाही. याशिवाय झारखंडमध्ये व्हॅक्सिनचं संकटही वाढलं आहे. त्यामुळेच झारखंडमध्ये अद्याप 18 वर्षांवरील युवकांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे झारखंडने अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, आता झारखंडलाच ऑक्सिजन कंटेनर्सच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

 

News English Summary: On the last Sunday of every month, Prime Minister Narendra Modi interacts with the people through the program ‘Mann Ki Baat’. The Chief Minister of Jharkhand has taken the news of the Prime Minister from his ‘Mann Ki Baat’. Jharkhand Chief Minister Hemant Soren has hit out at Prime Minister Narendra Modi in a tweet. He said in his tweet that the Prime Minister called but did not listen and just told himself.

News English Title: Jharkhand CM Hemant Soren said PM Modi has interest in Mann Ki Baat only news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x