29 March 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी
x

लष्करावर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा योग्य माहिती द्या, भावनिक खेळ बंद करा - कमल हसन

kamal Hassan, PM Narendra Modi, India China, Ladakh

चेन्नई, २१ जून : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्‍स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्‍ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.

आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”

दरम्यान, अभिनेता आणि राजकीय नेते कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून लडाखमधील भारतीय आणि चिनी सैनिकांच्या चकमकीवरुन लोकांच्या भावनांशी खेळू नका असं म्हटलं आहे. लोकांना भावनिकरित्या हाताळणं बंद करा अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले असून चीनचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं.

“अशा प्रकारची वक्तव्यं करुन लोकांच्या भावनांशी खेळलं जात आहे. माझी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना असं करणं बंद करा अशी विनंती करायची आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी सांगितलं आहे.

संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण विरोधकांना आणि देशवासियांना अशा संवेदनशील घटनांची योग्य माहिती दिली पाहिजे,” असं मत कमल हासन यांनी व्यक्त केलं आहे. ‘आपल्या लष्करावर अविश्वास दाखवू नका किंवा देशविरोधी होऊ नका असं म्हणण्यापेक्षा योग्य माहिती दिलं तर जास्त चांगलं होईल,” असं कमल हासन यांनी म्हटल आहे. पारदर्शकता आणि जबाबदारी असली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: Actor and political leader Kamal Haasan has slammed Prime Minister Narendra Modi for not playing with people’s feelings over the clash between Indian and Chinese troops in Ladakh. “Stop dealing with people emotionally,” he said.

News English Title: Kamal Haasan Tells Centre To Stop Emotionally Manipulating People Over Ladakh News latest Updates.

हॅशटॅग्स

#Kamal Hassan(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x