20 April 2024 4:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

VIDEO | ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रचारसभेत शेतकऱ्याचा मृत्यू | पण त्यांनी भाषण सुरुच ठेवले

Madhya Pradesh, Farmer Dies, MP Jyotiraditya Scindia Rally, Congress Slams BJP

भोपाळ, १९ ऑक्टोबर : भाजपाचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सभेसाठी आलेल्या एका शेतकऱ्याचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भाषण सुरु होण्याआधी ही घटना घडली. रविवारी खांडवा जिल्ह्यात भाजपाची सभा सुरु असताना या ८० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

येत्या तीन नोव्हेंबरला मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा ठेवण्यात आली होती. त्याचा प्रचार करण्यासाठी शिंदे गेले होते. शिंदे येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणे चालू होती. दरम्यान, पंढना येथील भाजपचे आमदार राम डांगोरे भाषण देत होते, त्यावेळी 80 वर्षीय शेतकरी जीवनसिंग यांचा अचानक मृत्यू झाला.

शेतकऱ्याचा मृत्यू होताच आजुबाजुच्या खुर्च्यांवर बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. तरीही नेत्यांचे भाषण थांबले नाही. ज्योतिरादित्य सिंधिया मंचावर पोहोचण्याआधीच या शेतकऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. सिंधिया यांना जीवन सिंह यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिल्यानंतर, त्यांनी या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहिली व भाषण सुरु करण्याआधी एक मिनिटाचे मौन पाळले.

 

News English Summary: A farmer reportedly died of a heart attack during a public meeting in Madhya Pradesh where BJP’s Rajya Sabha MP Jyotiraditya Scindia was scheduled to speak, officials said. The 80-year-old farmer passed away while a public meeting was underway in the state’s Khandwa district on Sunday. The rally was held ahead of Madhya Pradesh bypolls scheduled on November 3.

News English Title: Madhya Pradesh Farmer Dies At MP Jyotiraditya Scindia Rally Congress Slams BJP For Carrying On With Speech News updates

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x