19 April 2024 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

राजकारण तापलं, ज्योतिरादित्य सिंधियांच्या ट्विटवरून 'भाजप' उल्लेख हटवला

Madhya Pradesh, Jyotiraditya Scindia, deleted BJP from Twitter

भोपाळ, ६ जून : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवणीवर पडला आहे. अशातच मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या समर्थकांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिंधिया यांच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचे समजते.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळावरून काही संभाव्य तारखा अनौपचारिकरित्या जाहीर केल्या आहेत. राज्यातील पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली, ती माध्यमांतून लीक झाली. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. याचबरोबर, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जोतिरादित्य सिंधिया यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आता कमी झाली आहे. दरम्यान, ग्वाल्हेर-चंबळ विभागात त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाजपा प्रवेशास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले होते.

भाजपाने पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या २२ समर्थक आमदारांना तिकिट देण्याचा दावा केला आहे. मात्र, आता या समर्थक आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनके जागांवर भाजपाला आपल्या जुन्या नेत्यांमध्ये बंडखोरी दिसून येत आहे. हातपीपल्यातील दीपक जोशी असो किंवा ग्वाल्हेरमध्ये यापूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले बेलेंदु शुक्ला असोत. भाजपाला आपल्या नेत्यांना पटवून देणे अवघड जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक माजी आमदारांच्या काही जागांवर विजय मिळविण्यावरही शंका उपस्थित होत आहे.

 

News English Summary: Jyotiraditya Scindia, who left the Congress a few days ago and joined the BJP, has once again come under discussion. He is understood to have removed the mention of BJP in his Twitter account bio. Therefore, the politics of Madhya Pradesh is likely to change once again. Jyotiraditya Scindia has now started calling himself a public servant and a cricket lover in his bio on Twitter.

News English Title: Madhya Pradesh Jyotiraditya Scindia deleted BJP from Twitter discussions abound News Latest Updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x