29 March 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

कृषी मंत्र | पावसाळ्यात जनावरांना होणारे नुकसानकारक आजार? | वाचा उपाय योजना

Diseases of farmers animals

मुंबई, ३० मे | सध्या पावसाचे दिवस तोंडावर आले आहेत, पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे ओघानेच येतात. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरांच्या मरतू कीचे प्रमाण वाढते. जर जनावरांची व्यवस्थित प्रमाणे काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.

पावसाळ्यात जनावरांना कासेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कासेची स्वच्छता व्यवस्थित राखणे हे होय. त्यासाठी जनावरांचे दूध काढून झाल्यानंतरदिवसातून दोन वेळा जनावरांचे सर्व सड जंतूनाशक मध्ये बुडवून धरल्यास फायदा होतो.त्याकरता उपलब्ध असणारे जंतुनाशकबाजारात विविध नावाने मिळतात. अतिपावसामुळे किंवा पूरस्थिती मुळे जागोजागी पाणी साचते व हे पाणी दूषित असते. असेच गढूळ पाणी दूषित पाणी जनावरे प्यायले तर जनावरांमध्ये रोगराई पसरू शकते.

म्हणून मुख्यत्वेकरून विहिरीचे किंवा नळाचे पाणी जनावरांना प्यायला द्यावे. गोठा च्या अवतीभवती छोटे खड्डे असतील तर ते खड्डे मुरूम टाकून बुजवावे.गोठ्यामध्ये खाचखळगे असल्यास त्यामध्ये जनावरांचे शेण व मूत्र साचून दलदल तयार होते. त्यामुळे जनावरांना कासदाह होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा असे खाचखळगे मुरुमाने भरून द्यावे.

पावसाळ्यात कोवळा चारा फारच झपाट्याने वाढत असल्याने असा कोवळा चारा इतर चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात खायला द्यावे. कारण अशा कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये अपचन, पोट फुगी चे आजार उद्धव शकतात. या काळामध्ये गवत सुद्धा दूषित झालेले असते. या साऱ्यावर जनावरे न बांधता शेतातील बांधाच्या उंचवट्यावर चे गवत आणि वाळलेला कोरडा चारा जनावरांना द्यावा.

पावसाळ्यात जनावरांना होणारे महत्त्वाचे आजार:

कासदाह:
या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अति पातळ व रक्त व पू मिश्रित येते. जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी कास जंतुनाशक ने कास स्वच्छ धुवावी.अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घेणे.

घटसर्प:
या रोगात जनावरे एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते, अंगात ताप भरतो, गळ्याला सूज येऊन डोळे खोल होतात तसेच घशाची घरघर सुरू होते.या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑइल ॲड जुवंट एच. एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.

फऱ्या:
या रोगाची लक्षणे म्हणजे अचानक ताप येतो, मागचा पाय लंगड तो, जनावरांच्या मांसल भागाला सूज येते, सुज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरुवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

तिवा:
या रोगामध्ये जनावरांना सडकून ताप येतो. जनावरांचे खाणे म मंदावते तसेच जनावर थरथर कापायला लागते, एका पायाने लंगड ते,मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.

पोटफुगी:
या आजारात जनावराची डावी कूस फुगते. जनावरे बेचैन होऊन त्यांचे खाणे व रवंथ करणे बंद होते. सारखी उठबस करतात. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला वकोवळा चारा अति प्रमाणात देऊ नये.

हगवण:
या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्त आणि शेन मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावरे मलूल होतात. अशुद्ध व घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.

बळीराजाच्या जीवनात जनावरांना मोठं स्थान असतं. शेतीची कामे म्हटले की, या कामांसाठी गुरांची गरज असते. याशिवाय दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी जनावरे फार महत्त्वाची असतात. प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या आहाराची, तब्येतेची काळजी घेतली पाहिजे. सध्या मॉन्सून चालू झाला याकाळात जनावरांमध्ये विविध प्राणघातक आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात घातक जिवाणूंची संख्या वाढून जनावरांमध्ये विविध आजार आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने पायखुरी व तोंडखुरी, घटसर्प, फाशी हे रोग आढळून येतात. शेतकरी बंधूंना आपली जनावरे आजारी आहे की नाही हे लक्षात येत नाही व वेळीच उपाययोजना न केल्यामुळे जनावर दगावून खूप नुकसान होऊ शकते. आपले जनावर दगावून नये म्हणून खालील लक्षणे जनावरांमध्ये दिसल्यास लगेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

जनावरांची आजारपणाची लक्षणे:

  1. जनावर सुस्त व अस्वस्थ दिसून आढळून येते.
  2. श्वाशोच्छवासाची गती वाढणे, मंदावणे.
  3. डोळ्यातून सतत पाणी वाहणे.
  4. डोळ्यातील पापणीचे आवरण लाल किंवा पिवळसर दिसून येणे.
  5. कपातून वेगळे कळपातून वेगळे होऊन सुद्धा उभे राहणे.
  6. भूक मंदावणे किंवा संपूर्ण खाणे बंद करणे.
  7. सतत ओरडत किंवा हंबरत राहणे.
  8. तोंडातून लाळ किंवा फेस गळणे.
  9. शेणाचा विशिष्ट दुर्गंध येणे, शेण पातळ किंवा अति घट्ट आढळून येणे.
  10. दुभत्या जनावरांचे दूध कमी होणे किंवा आटणे.
  11. नाकातून, दुधातून, लघवीतून रक्त पडणे.
  12. वेळेवर माजावर न येणे किंवा घाबरून राहणे, गाभण न राहणे.

अशा पद्धतीची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नये म्हणून करावयाची उपाययोजना:

  1. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक द्यावे.
  2. जनावरे कोरड्या जागेवर मोकळ्या हवेत बांधावीत.
  3. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश पडेल, अशा पद्धतीने गोठ्याचे व्यवस्थापन करावे.
  4. पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे की घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकत इत्यादी रोग होऊन जनावर दगावू नये, म्हणून लसीकरण करून घ्यावे.
  5. कासदाह या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते यावर स्वच्छता राखणे. हा एक प्रतिबंधात्मक पर्याय आहे म्हणून पावसाळ्यात गोठा नेहमी स्वच्छ ठेवा.
  6. पावसाळ्यात नदी तलाव पाण्याच्या स्रोतांमध्ये गढूळ पाणी असते ते पाणी आपण जनावरांना दिल्यास आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणून शक्यतो. पावसाळ्यात नळाचे किंवा विहिरीचे पाणी जनावरांना द्यावे.
  7. पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचून रोगराई वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे गोठा सर्व बाजूंनी समतल करून घ्यावा. कुठेही खड्डा असता कामा नये. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी व्यवस्थापन केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो.

 

News English Summary: Currently, the rainy days have come to an end. During the rainy season, the animals get diseases like ferns, snakes, salivary glands and scabies. This increases the mortality rate of a large number of animals during the rainy season. If the animals are not taken care of properly, the farmers may suffer a huge financial loss.

News English Title: Major diseases of farmers animals during monsoons Krushi Mantra news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x