24 April 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

दिल्लीत कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांत रुग्णालयातून घरी सोडणार

Delhi, Union Health Ministry, Covid 19

नवी दिल्ली, ६ जून: कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेने शनिवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यामुळे आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ११५९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११४०७३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे.

 

News English Summary: Patients with no symptoms of corona virus and mild symptoms need not be admitted to the hospital, the Union Ministry of Health had recently said. Against this backdrop, the health system in Delhi has taken a big decision. Accordingly, patients with corona symptoms and mild symptoms will be discharged from the hospital within 24 hours.

News English Title: Mild or asymptomatic Covid 19 patient has to be discharged by the hospital within 24 hours of admission Delhi health department News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x