20 September 2021 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस
x

मोदींच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्री १०वी - १२वी शिकलेले; आता IAS-IPS अधिकारी सलाम ठोकणार

Narendra Modi

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यातील एकूण १६ जणांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली आहे. तर ८ मंत्र्यांनी १०वी ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेतलं असून ४७ मंत्री हे पदवीधर आहेत. शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २४ कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास १४.७२ कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह ४ मंत्र्याकडे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती २१७ कोटी रुपये आहे. ५६ मंत्र्यापैकी २२ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(259)#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x