20 April 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

केवळ नावाने 'अवजड' असणारं खातं मिळण्याची शक्यता | विस्ताराच्या नावाने राज्यात राजकारणाच्या उद्योगासाठी वापर?

MP Narayan Rane

मुंबई, १५ जून | मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं सांगितलं जातं आहे आणि त्यातच महाराष्ट्रातून एखाद दोन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल अशी चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे यावर कुणी काही बोलायला तयार नाही. पण ज्या दोन नेत्यांचं नाव चर्चेत आहे, त्यातले एक आहेत नारायण राणे आणि दुसऱ्या आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे.

दरम्यान, ही नावं चर्चेत असली तरी त्यांना कोणतंही महत्वाचं आणि सामान्य जनतेशी निगडित असलेलं खातं दिलं जाणार नसल्याचं वृत्त आहे. केवळ मराठा आणि ओबीसी चेहरे असं राजकारण असून त्यात राज्याचा काही फायदा होईल अशी शक्यता अधिक असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत मोदींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. हेच मंत्रालय राणेंना मिळण्याची शक्यता आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सध्या या मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे २०१४ पासूनच अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे होतं. त्यावेळी अनंत गीते यांच्याकडे मंत्रालयाचा कार्यभार होता. केवळ नाव ‘अवजड’ असणारा खातं राणेंना मिळविणार असून त्याचा राज्याला फायदा नगण्य तर शिवसेना विरोधी राजकारणाला हवा देण्यासाठीच वापर होईल असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MP Narayan Rane might get heavy industries ministry in Modi cabinet news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x