14 December 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी | शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार? - भाई जगताप

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, Farmers Protest, Ambani scorpio case

मुंबई, २० मार्च: मागील १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात आज पर्यंत शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणताही खेद किंवा गरजेचं पाऊल टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील केंद्र सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण सुरु असून त्याचा लाभ देशातील वरिष्ठ नेते मंडळी देखील घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी. मीही कोरोना लस घेईन, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

मात्र केंद्र सरकार आणि प्रसार माध्यमांकडून याबद्दल कोणतीही वाच्यता होताना दिसत नाही तसेच. तसेच याबद्दल सरकारला काही प्रश्न विचारण्याचा त्रास देखील माध्यमं घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुकेश अंबानींच्या घराजवळील स्कॉर्पिओ प्रकरणानंतर प्रसार माध्यमांना पूर्णवेळ कार्यक्रम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सरकार आणि माध्यमांना देखील सुनावलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “२५० शेतकरी आंदोलनात शहीद, पण मीडियाला अंबानीच्या जीवाची काळजी…शेतकरी प्रश्नांवर मीडिया चर्चा केव्हा घेणार..??

 

News English Summary: For the last 100 days, farmers have been protesting against the Agriculture Act on the borders of Delhi. Hundreds of farmers have lost their lives in this agitation till date. However, no regrets or necessary steps have been taken by the central government in this regard. As a result, there is growing anger among the farmers against the central government.

News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised Media too over stand on Ambani scorpio case news updates.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x