20 June 2021 9:47 PM
अँप डाउनलोड

सरदार पटेलांचा एव्हढा घोर अपमान फक्त भाजपा आणि संघीच करू शकतात - आ. भाई जगताप

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, Stadium renaming, Narendra Modi Stadium

मुंबई, २४ फेब्रुवारी: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्य नावाला बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला प्राथमिकता दिल्याने भाजपवर समाज माध्यमांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार आमदार भाई जगताप यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम चे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम..!!….सरदार पटेलांचा एव्हढा घोर अपमान फक्त भाजपा आणि संघीच करू शकतात..!!

 

News English Summary: The Sardar Vallabhbhai Patel Stadium in Motera, Gujarat, known as the largest cricket stadium in the world, has been named after Prime Minister Narendra Modi. The stadium has been renamed as Narendra Modi Stadium Ahmedabad. The third Test between India and England will be played at the same ground from today.

News English Title: Mumbai congress president MLA Bhai Jagtap Slams BJP over stadium renaming as Narendra Modi Stadium news updates.

हॅशटॅग्स

#Congress(496)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x