23 April 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

प्रदूषणामुळे विजयानंतर फटाके न फोडण्याचे केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांना आदेश

No Fire crackers, victory celebration, AAP, Arvind Kejariwal, Delhi Pollution

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार,… पुन्हा केजरीवाल सरकार कमबॅक करणार का?… भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी कशी असेल?…. आपची हॅटट्रिक भाजप रोखणार का?… मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरणार का?…. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळत आहेत.

सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली. निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नका, असं आवाहन केजरीवालांनी केलं आहे. दिल्लीतलं प्रदूषण वाढू नये, यासाठी केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे.

तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदाराला राष्ट्र द्वेषींना हटवा असं आवाहन केलं होतं. मात्र निकालाअंती दिल्लीतील मतदाराने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनाच हटवलं असल्याचं निकाल सांगतो. त्यामुळे मतदाराने जो संदेश द्यायचा तो राष्ट्रीय पक्षांना दिला असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बागमधील आंदोलन भाजपानं मुख्य मुद्दा बनवला होता. राष्ट्रवादाच्या मुद्यावर भाजपानं ‘आप’ला लक्ष्य केलं. त्यामुळे शाहीन बाग असलेल्या ओखला मतदारसंघामधून आपचा उमेदवार आघाडीवर आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व कौल हाती आले असून, दिल्लीकरांनी पुन्हा ‘आप’ला सत्तेत बसवलं आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपाला अपयश आलं आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभव येणार असल्याचं दिसत आहे. कौल हाती आल्यानंतर ‘आप’चं कार्यालय सज्ज झालं आहे.

मतमोजणीपूर्वीच भाजपचे दिल्ली अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी विजयाचा दावा केला होता. पण भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टर्समुळे भाजपने अगोदरच पराभव तर मान्य केला नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. विजयाने आम्ही अहंकारी होत नाही, पराभवाने खचून जात नाही, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

 

Web Title:  No Fire crackers during victory celebration says Arvind Kejariwal to party workers

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x