महत्वाच्या बातम्या
-
Same Charger for All Devices | तुम्हाला सर्व डिव्हायसेससाठी एकच चार्जर मिळणार, सरकार काय निर्णय घेतंय जाणून घ्या
ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी बुधवारी सांगितले की, मोबाइल, टॅब्लेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सर्व उपकरणांसाठी एकच चार्जर असण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सरकार तज्ज्ञ गटांची स्थापना करेल. हे गट दोन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करतील. उद्योगातील भागधारकांशी झालेल्या बैठकीनंतर सचिव म्हणाले की, भारत सुरुवातीला दोन प्रकारचे चार्जर्स स्वीकारण्याचा विचार करू शकतो. यात सी टाइप चार्जरचाही समावेश आहे. ‘हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. देश चार्जर्स तयार करण्याच्या स्थितीत आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी उद्योग, वापरकर्ते, उत्पादकांसह सर्वांचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | लहान मुलांच्या तिकीट बुकिंग भाड्यावर महत्वाचे अपडेट्स, संबंधित नियम लक्षात ठेवा
IRCTC Railway Ticket | जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि मुलांची तिकिटं घ्यायची की नाही हे तुम्हाला समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
2 वर्षांपूर्वी -
निधी वाटपावरून शिंदे गट तोंडघशी पडला, मुख्यमंत्री पदाला अर्थ नसल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी दाखवून दिलं | भाजपाला मजबूत निधी
राष्ट्रवादीकडून निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीने स्वत:ला अधिक निधी घेतला. त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक निधी दिला. पण शिवसेनेला कमी निधी दिला. आम्ही मतदारसंघात कामं कशी करायची? असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तेत शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद आलं. पण त्या बदल्यात भाजपने महत्त्वाची खाती घेतली.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बसायला जागा कुठे आहे?, खूप जागा आहे चल सरक, मेट्रो ट्रेनमधील महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
दिल्ली मेट्रोतून प्रवास करत असाल तर हा प्रवास किती आव्हानात्मक आहे, हेही तुम्हाला माहिती असायला हवं. कधी गर्दीने हुज्जत घातली, तर कधी एखाद्या जागेसाठीची धडपड, कुठे तरी पोहोचण्यासाठी किती अडचणींना तोंड द्यावे लागते, हेच कळत नाही. अनेकदा लोक या गोष्टींबाबत आपापसात वाद घालू लागतात. अशा वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन महिला आपापसात एका सीटसाठी भांडताना दिसतील.
2 वर्षांपूर्वी -
काश्मिरी पंडित किंवा पाकिस्तानमधून आलेल्या हिंदूंना नव्हे तर रोहिंग्यांना सुरक्षेसह दिल्लीत फ्लॅट देण्याची मोदी सरकारची योजना
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी बुधवारी ट्विट केले होते की, रोहिंग्यांना मूलभूत सुविधा आणि चोवीस तास सुरक्षेसह फ्लॅट देण्याची सरकारची योजना आहे. या प्रकरणाला आम आदमी पक्षाने प्रथम आक्षेप घेतला. विश्व हिंदू परिषदेनेही सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. आता या संपूर्ण प्रकरणात हा वाद समोर आल्यानंतर गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. नवी दिल्लीतील बक्करवाला येथे रोहिंग्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये धाकधूक! पक्षाची सदस्य संख्या 18 कोटी | तिरंगा सेल्फी पोर्टलकडे 15 कोटी सदस्यांची सुद्धा पाठ, भावनिक लाट ओसरल्याने चिंतेत
ऑगस्ट २०१९ प्रमाणे भारतीय जनता पक्षच्या एकूण सदस्यांची संख्या १८ कोटींवर आहे, अशी माहिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वतः दिल्लीत जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलै २०१९ मध्ये वाराणसीयेथून सुरू केलेल्या पक्षाच्या सदस्यता मोहिमेला संपूर्ण भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला, असे नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र सध्याच्या डेटाप्रमाणे भाजपमध्ये स्वस्वस्थता पसरली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये दिल्लीत बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. भाजपच्या आयटी सेलने केलेल्या अनॅलिटीक्स रिपोर्टमध्ये जी आकडेवारी समोर आली आहे त्यातून भाजपाची झोप उडाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
BREAKING NEWS | भाजपच्या नव्या निवडणूक समितीची स्थापना, गडकरी आणि शिवराज यांना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवलं
आपल्या संसदीय मंडळात मोठा बदल करत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना यातून वगळले आहे. याशिवाय आणखीही काही नावे यातून काढून टाकण्यात आली आहेत. भाजपच्या संसदीय मंडळात आता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
2 वर्षांपूर्वी -
Salary Hike In 2023 | कंपन्या 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात अधिक वाढ करणार, रिपोर्ट काय सांगतो पहा
भारतातील कंपन्या २०२३ मध्ये १० टक्क्यांनी पगारवाढ करतील, अशी अपेक्षा आहे, जी २०२२ मधील सरासरी पगारवाढीपेक्षा अर्धा टक्का जास्त आहे. 2022 मध्ये भारतातील कंपन्यांनी सरासरी 9.5 टक्के पगारात वाढ केली. एका अहवालानुसार, कामगार बाजारात कंपन्या कडक अटींचा सामना करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
विरोधकांना केंद्रीय एजन्सीच्या धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरील ईडी आणि सीबीआय केसेसचा इतिहास, वाचा सविस्तर
मुंबईस्थित बनारसमधील भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या अडचणी २०२० मध्ये प्रचंड वाढल्या होत्या. सीबीआयनंतर आता ते सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) निशाण्यावर होते. बँक ऑफ इंडियाच्या ६७ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी ईडीने जुलै २०२० भाजप नेत्यासह अन्य सात जणांविरोधात चौकशी सुरू केली होती.
2 वर्षांपूर्वी -
भाजप नेते मोहित कंबोज यांना घेरून त्यांच्यावरील ईडी, सीबीआय केसेस संदर्भात प्रश्न न विचारता माध्यमांनी विरोधकांना घेरलं, नेटिझन्सकडून संताप
५७ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जून २०२० मध्ये मुंबईतील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने छापा टाकलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मोहित कंबोज यांचे निवासस्थान होते. त्यावेळी एका खासगी कंपनीसह आरोपींच्या निवासी आणि अधिकृत परिसरात शोध घेण्यात आला होता. या छाप्यात मालमत्ता, कर्ज, विविध बँक खाती आणि लॉकरच्या चाव्या यासह संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाचे सर्व्हे येताच, भाजपच्या अमराठी नेत्यांचं विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात धमक्यांचं तांडव सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत दिसणार या आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सेव्ह धिस ट्विट असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झाले. यामध्ये सांस्कृतिक खात्याची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरमुनगंटीवार यांच्या खांद्यावर पडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत अशी माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | लहान भाऊ गच्चीवरून पडला, पण देव बनून आला मोठा भाऊ, थरारक व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
अडचणीत आपलेच कमी येतात असं म्हटलं जातं. मात्र, कधी कधी संकटात सापडलेला कोण कोणासाठी देव म्हणून येऊन वाचवेल, असेही सांगता येतं नाही. असाच काहीसा प्रकार केरळमधील मलप्पुरममध्ये घडला. येथे दोन भावांचा एक व्हिडिओ आहे जो सर्वांना भावनिक बनवू शकतो. खरं तर लहान भाऊ बाल्कनी साफ करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडू लागला. खाली उभ्या असलेल्या मोठ्या भावाने जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. अशातच त्याचा जीव वाचला.
2 वर्षांपूर्वी -
ITBP Bus Accident | काश्मीरमध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 7 जवान शहीद, 6 जण गंभीर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा अपघात झाला आहे. आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी परिसरात दरीत कोसळली. या अपघातात 7 जवान शहीद झाले असून यात 6 आयटीबीपी आणि 1 पोलीस कर्मचारी आहे. तर 32 जवान जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी जवानांना श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
2 वर्षांपूर्वी -
केंद्राचा प्रत्येक विषयात व्यावसायिक दृष्टिकोन? | ऐतिहासिक लाल किल्ल्यात रेस्टॉरंट उघडलं, राष्ट्रीय स्मारकातूनही महसूल कमाई
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाल किल्ल्याला भेट देणार असाल तर इथे नवी गोष्ट सापडेल. कॅफे दिल्ली हाइट्सने १६ ऑगस्टपासून लाल किल्ल्याच्या आत एक नवीन आउटलेट उघडले आहे. यात विशेष बाब म्हणजे हे रेस्तराँ सुरू झाल्याने लाल किल्ला हे स्वत:चे रेस्टॉरंट असलेले देशातील पहिले राष्ट्रीय स्मारक ठरले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Assembly Election 2022 | राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, काँग्रेसची मोठी व्यहरचना
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत 16 ऑगस्ट रोजी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. १६ ऑगस्ट रोजी विशेष विमानाने ते सकाळी ९:०० वाजता जयपूरहून सुटतील आणि सकाळी १०:३० वाजता सुरतला पोहोचतील. मुख्यमंत्री गेहलोत संध्याकाळी 5:30 वाजता सुरतहून निघतील आणि संध्याकाळी 6:30 वाजता राजकोटला पोहोचतील जिथे ते राजकोट विभागातील नेत्यांची बैठक घेतील आणि रात्री 10:00 वाजता वडोदराला रवाना होतील. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते वडोदरा विभागातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. मुख्यमंत्री गेहलोत वडोदराहून संध्याकाळी 5:30 वाजता रवाना होतील आणि संध्याकाळी 6:00 वाजता अहमदाबादला पोहोचतील.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Election | देशात सोडा, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजप पराभवाच्या छायेत, 'आप' धक्का देणार - सर्व्हे
गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्यासाठी आप पक्ष जोरदारपणे कामाला लागला आहे. पंजाबनंतर आता थेट गुजरातमध्ये विजयाच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे येथे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने इथली जनता भाजपच्या २७ वर्षाच्या कारभाराला कंटाळल्याचं लोकांच्या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
विनायक मेटे यांचं अपघाती मृत्यू प्रकरण | ट्रकचालक सापडला, पण प्रत्यक्षात तो ट्रक कुठे आहे? संशय बळावू लागला
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | तुम्ही सहकुटुंब पिझ्झा ऑर्डर करून खाता?, त्याच पिझ्झा ब्रेडवर झाडू-पोछा लटकताना दिसला, व्हिडिओ व्हायरल
टीव्हीवरची जाहिरात असो किंवा पोस्टर पिझ्झा असो, प्रत्येकाच्या मनात मोह होईल अशा पद्धतीने पिझ्झा सादर केला जातो, पण या जाहिरातीतील तेजस्वी चेहऱ्यामागे कधी कधी काही दृश्ये दडलेली असतात की, अशा गोष्टी पाहिल्यानंतर कधीही अशा गोष्टी खाव्याशा वाटत नाहीत. जर तुम्हाला खात्री नसेल तर हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना पाहा.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाषणात सामान्यांचे प्रश्न, रोजगार देण्यावर भर | मोदींच्या भाषणात महागाई-बेरोजगारीवर भाष्यच नाही
बिहारमध्ये आज सोमवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधी मैदानापासून प्रत्येक सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये तिरंगा फडकला. शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गांधी मैदानात पोहोचून ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. रोजगाराबाबतही ते मोठे बोलले.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय? पुढे काय होणार?
- Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर पुढे मजबूत कमाई करून देईल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
- Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?
- SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची मजबूत परतावा देणारी FD योजना, बचतीवर मोठा व्याज दर मिळेल
- Multibagger Stocks | अल्पावधीत 925% परतावा देणारा शेअर पुन्हा बंपर परतावा देणार, दिग्गजांनी खरेदी केले शेअर्स