25 April 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

BREAKING | चक्क 'नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद' | नेमका विषय काय?

PM Narendra Modi

मुंबई, ०७ ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियासमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अकाऊंटवरुन दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये काहीच दिसत नसून केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आलाय. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत असं या फोटोमधून अधोरेखित करण्यात आलं आहे.

तसेच हा फोटो शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसने #BJPFearsRahulGandhi हा हॅशटॅगही वापरला आहे. पत्रकार परिषदेतील राहुल गांधी आणि कधीही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अशी तुलना करत काँग्रेसने, “..म्हणूनच भाजपा राहुल गांधींना घाबरते,” असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi press conference tweet by Maharashtra congress news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x