13 December 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
x

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे

Raj Thackeray, Mamta Banerjee, EVM, Ballet Paper

कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी पत्रकारांना सामोरे गेले आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. मी ईव्हीएमची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन मांडली, परंतु त्यासंदर्भात कोणतीही पावलं उचलण्यात आली नाही. माझा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वासच उडाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

या भेटीमध्ये निवडणूक सुधारणा, मतपत्रिकेद्वारे मतदान व राजकीय परिस्थिती यासारख्या विषयावर चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांना ठाकरे यांनी दूरध्वनी केला होता. त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x