25 April 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

‘मन की बात’वरून राहुल गांधींचा मोदींना सवाल

Rahul Gandhi, national defense and security

नवी दिल्ली, २८ जून : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही सवाल उपस्थित केले होते. त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. त्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर निशाणा साधला आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची ‘बात’ कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. त्यावर राहुल गांधीने मोदींना ट्विट करत टिप्पणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सीमेवरील तणावरुन मोदी सरकारला घेरत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लडाखच्या गलवान खोऱ्यात नक्की काय घडलं याचं सत्य मोदी सरकारने जनतेसमोर आणावं असं राहुल गांधी म्हणाले होते. तसेच, देशातील वाढत्या इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारला घेरले आहे. मोदी सरकारने कोरोनाची साथ आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केलेल्या आहेत, असे एका ट्विटमध्ये राहुल म्हणाले होते.

तसेच, काही दिवसांपूर्वी एक लेख शेअर करत ते मोदींना सरेंडर मोदी म्हणाले होते. त्यावरूनही राजकीय वातावरण तापलं होतं. त्यात आता त्यांनी मन की बात कार्यक्रमावर आक्षेप घेतल्याने अनेक भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

 

News English Summary: Rahul Gandhi has asked when there will be a ‘talk’ of national defense and security. Prime Minister Narendra Modi addressed the people of the country on his radio program ‘Mann Ki Baat’ on Sunday. Rahul Gandhi has commented on this by tweeting Modi.

News English Title: Rahul Gandhi has asked when there will be a talk of national defense and security News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x