12 December 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे दिल्ली, युपी व तेलंगणा सरकारची डोकेदुखी वाढली

Corona Crisis, Covid 19

लखनऊ, ३१ मार्च: दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तेलंगणमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहा जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे लक्षात घेत उत्तर प्रदेशाच्या पोलिस महासंचालकांनी १८ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या या सहा जणांनी १३ मार्च ते १५ मार्चच्या दरम्यान तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यानंतर एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं. या धार्मिक कार्यात उपस्थिती लावलेल्या प्रत्येकानं समोर येऊन माहिती द्यावी त्यांच्या उपचारांचा खर्च उचलला जाईल, असं त्यात लिहलं होतं.

तबलिगी जमातीच्या परदेशी प्रचारकांच्या हजरत निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमधील लोकांना सहभाग घेतला होता. यादीत नोंद असलेल्या १८ जिल्ह्यांमधील लोकांचा शोध घेऊन संसर्ग झालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात यावे असे पोलिस महासंचालकांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

दिल्ली सरकारनं निजामुद्दीन परिसरातील २०० जणांना विलग केलं आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याची मोठी मोहीम दिल्ली पोलिसांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत १०० लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल आज येणार आहेत. १ ते १५ मार्चपर्यंत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात इंडोनेशीया आणि मलेशियामधूनही काही लोक आले होते, यात एकूण २ हजार लोकांचा सहभाग होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतरही हा कार्यक्रम सुरुच होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

News English Summary: Corona virus kills 6 in Telangana on Monday The six were involved in a religious program of the Tbiligi tribe organized in Nizamuddin in Delhi. A religious event was held at the headquarters of the Markaz Tabligi tribe. All the attendees of this program are being contacted and their tests are being conducted. People in the Nizamuddin area have been sent for private corpses on Monday night and Tuesday morning at various hospitals in the city for coronas testing. The six men who died of coronas had attended a religious program of the Tbiligi tribe from March 13 to March 15. Then a circular was announced. It was written that everyone present in this religious activity should come forward and inform them that the cost of their treatment will be taken up.

 

News English Title: Story 6 Telangana men who took part in prayers at Delhi Nizamuddin die of Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x