29 March 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

भारतीय नौदलातील किमान २१ जणांना कोरोनाची लागण

Covid19, Corona Crisis, Indian Navy

नवी दिल्ली, १८ एप्रिल : कोरोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

नौदलातील नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचं हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे. यापूर्वी आर्मीच्या ८ सैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाच्या आयएनएस आंग्रे या तळावर ७ एप्रिलला कोरोना बाधित पहिली केस समोर आली होती. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी करण्यात आली अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २१ जवानांना मुंबईतील INHS या नेव्ही रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात ‘आयएनएस आंग्रे’ या नौदलाच्या प्रशासकीय तळावर आढळलेल्या २० करोनाबाधित जवानांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, या जवानांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती.

 

News English Summary: At least 20 Indian Navy personnel have been infected with the Corona virus. All of them have been shifted to the Naval Hospital in Mumbai for treatment, Naval officials have told Hindustan Times on condition of anonymity.

News English Title: Story at least 20 Indian Navy personnel test positive for Covid 19 Corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x