19 April 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली

Chief Minister Uddhav Thackeray, PM Narendra Modi

नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान ही बेत तब्बल १ तास चालली ज्यामध्ये राज्यासंबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलंय. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान ठाकरे सरकारला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेतही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत असं सांगितलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेली बैठक काही वेळापूर्वीच संपली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील भेट घेणार आहेत.

 

Web Title: Story Chief Minister Uddhav Thackeray meet PM Narendra Modi at New Delhi.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x