उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही तर मक्केला जावं...
अयोध्या: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास नाराज असून त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मक्का येथे जाण्याचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत महंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं. ते पुढे असंही म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्तानाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेचं गठण केलं होतं. कारण जगात हिंदूचा स्वत:चा कोणताही देश नाही. बाळासाहेबांचं स्वप्न भारताला हिंदूराष्ट्र बनवायचं होतं’.
देशाला हिंदूराष्ट्र बनवायचं स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं. जगात हिंदूंचा स्वत:चा कोणताही देश नाही, म्हणून हिंदूराष्ट्रासाठी बाळासाहेब आग्रही होते. त्यामुळेच, आम्ही कधीच शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही, असेही बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र, सत्तेच्या हव्यासासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, असे परमहंस दास यांनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडल्याचे दिसून आलं. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास विलंब झाला. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भाजपाची साथ सोडली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.
News English Summery: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray’s visit to Ayodhya is being opposed. Mahant Paramahansa Das of the ascetic camp in Ayodhya has accused Shiv Sena chief Uddhav Thackeray of threatening Ram devotees. He said, ‘Shiv Sena chief Uddhav Thackeray has threatened Ram devotees by compromising with the Congress for the loss of power. He will not allow them to come to Ayodhya, nor will they allow him to see Rama. I myself will block the road of Uddhav Thackeray ‘. The Mahant Paramahansa Das of the ascetic camp is angry and has advised Shiv Sena chief Uddhav Thackeray to go to Mecca. While targeting Uddhav Thackeray, Mahant said, ‘Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray’s visit to Ayodhya is political. So they should go to Mecca instead of Ayodhya. He further said that Shiv Sena had formed a Hindu Rashtra emperor Balasaheb Thackeray to make Hindustan a Hindu nation. Because there is no Hindu country of its own in the world. Balasaheb’s dream was to make India a Hindu state ‘.
News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray should go to Makka Madina said Ayodhya Mahant.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News