सावधान! कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? हा रुग्ण परदेशात गेला नव्हता...सविस्तर
मुंबई, २१ मार्च : तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.
हा तरूण काही दिवसांपूर्वी रेल्वेने दिल्लीहून तामिळनाडूला आला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. हा रुग्ण कोरोना विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला नाही. तो परदेशातूनही आलेला नाही. मग त्याला कोरोनाची बाधा कशी काय झाली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रोगपरिस्थिती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर आर गंगाखेडकर म्हणाले, हा रुग्ण परदेशात गेला नव्हता. तरीही त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आम्ही हा व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेत आहोत. तपासणीचे काम सखोलपणे करावे लागणार आहे. देशात अजून या विषाणूचा समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तामिळनाडूतील प्रकरणात अधिकारी तपास करीत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता ६३ वर पोहोचली आहे.
शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ११ जणांपैकी १० जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आले आहेत. तर ३ जणांना करोनाची बाधा संसर्गातून झाली आहे.
News English Summery: A 20-year-old girl in Tamil Nadu has been infected with a corona virus. But this young man did not go abroad. Health department officials are investigating how he was diagnosed with the Corona virus. The young man had gone to Delhi a few days ago. He had returned to Tamil Nadu by train. It is also believed that the coronary virus infection caused by this young person is the first example of this group’s infection in the country. The young man had come to Delhi from Delhi a few days ago by train. It was revealed that he had been infected with the Corona virus. This patient has not come in contact with a corona virus. He didn’t even come from abroad. Then the question of how Corona’s obstruction came to him has now been raised. Head of the Department of Disease Science of the Indian Council of Medical Research. RR Gangakhedkar said, this patient did not go abroad. He is still infected with the corona virus. We’re going to know who this person was in contact with. The inspection work has to be done strictly. Community transmission of the virus has not yet started in the country, the Union Health Ministry said. Authorities were investigating the case in Tamil Nadu.
News English Title: Story Corona virus is Tamilnadu Man Indias first community spread case News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA