13 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनिया गांधींकडून मोदींना खरमरीत सूचना

PM Narendra Modi, Sonnia Gandhi, Corona Crisis

नवी दिल्ली, ७ एप्रिल: कोरोनाच्या महामहारीशी लढण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व खासदार आणि सर्व राज्यपालांच्या मानधनात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देतानाच चार खरमरीत खडे बोल सुनावले आहेत. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, आधी स्वतःचे उदात्तीकरण करणाऱ्या टीव्हीवरच्या आणि वर्तमानपत्रातील तसेच इतर सोशल मीडियावरील हजारो कोटींच्या जाहिराती थांबवा आणि परदेश दौरे बंद करा.

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात पाच मुद्दे मांडले आहेत. त्यात त्यांनी दिल्लीच्या २० हजार कोटींच्या सौंदर्यीकरण योजनेचाही उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, ‘मोदीजी तुमचे स्वतःचे उदात्तीकरण करणारी ही ‘सेंट्रल व्हींस्टा ‘ सौंदर्यीकरण योजना थांबवा. तसेच टीव्ही आणि वर्तमानपत्रांना देण्यात येणाऱ्या हजारो कोटींच्या सरकारी जाहिराती थांबवा. तुमचे सगळे परदेश दौरे रद्द करा. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध होतील.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षभरासाठी ही कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासदारांना आपल्या मतदारसंघात विकासासाठी प्रतिवर्षी मिळणारा पाच कोटी रुपयांचा निधीही दोन वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सर्व निधी आता कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

या माध्यमातून सुमारे ७९३० कोटी रुपयांचा निधी उभा राहणार आहे. यापैकी २९ कोटी रुपये हे खासदारांच्या वेतन कपातीतून मिळणार आहेत. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यांचे राज्यपाल यांनीही आपल्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: The central government, led by Prime Minister Narendra Modi yesterday, decided to cut the honors of the President, Vice President, all MPs and all governors by thirty percent to fight the coronation epidemic. Congress president Sonia Gandhi today sent a letter to Narendra Modi, saying he had heard four false words in support of his decision. Sonia Gandhi told Narendra Modi that he had to stop tens of thousands of crores of advertisements on TV and newspapers and other social media that were self-deprecating earlier and stop touring abroad.

 

News English Title: Story in 5 point letter Sonia Gandhi asks Prime Minister Narendra Modi to go into austerity mode News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x