28 March 2023 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा
x

Corona Virus: दिल्लीत सर्दीची तपासणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले...पण?

China Corona Virus, Indian Corona Virus

नवी दिल्ली: चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत या आजारामुळे तब्बल १५०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि हजारोंच्या संख्येने लोक पीडित आहेत. हुबेई प्रांतातील वुहान या भागात सर्वाधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील एक व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेजवळ केवळ १५ सेंकद उभा होता. आणि केवळ १५ सेंकदात त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.

मात्र यानंतर भारतात देखील अनेक अफवा पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी हलक्या सरदीमुळे देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. ह्मणजे जर तुम्ही कोरोना व्हायरसची तपासणी करत आहात आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर घाबरून जाऊ नका! ज्या कोरोना व्हायरसची तुम्ही तपासणी करत आहात, तो एक साधा व्हायरस आहे. त्याला घाबरण्याची गरज नाही. धोका चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसचा आहे.

देश आणि जगात पहिल्यापासून उपस्थित असलेल्या कोरोना व्हायरसचा धोका नाही. चीनमध्ये जो कोरोना व्हायरस पसरलेला आहे, तो नवीन व्हायरस आहे. त्याचं नाव ‘२०१९ नोवल कोरोना वायरस’ आहे. जो COVID-19’च्या नावानंही ओळखला जातो. हा वायरस अद्याप दिल्लीत नाही. याची खातरजमा दिल्लीतल्या फक्त दोन प्रयोगशाळेत होत असून, एम्स आणि एनसीडीसीमध्ये याची तपासणी केली जाते. विनाकारण कोणीही तपासणी करू नका आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी घाबरून जाऊ नका असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Story India Corona Virus reports positive at Delhi Doctors says but do not need to Panic.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x