13 December 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

देशावर राष्ट्रीय संकट असताना देखील मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही

PM Cares Fund, Corona Virus, Corona Crisis, Covid 19, Prithviraj Chavan

मुंबई, १ एप्रिल: कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ट्रस्ट ‘पीएम-केअर’ वर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा ट्रस्ट निधी उभारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पीएम रिलीफ फंड किंवा पंतप्रधान मदत निधी अस्तित्वात असताना, पुन्हा ‘पीएम-केअर’ का असे गंभीर प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत.

अनेकांनी कोरोना आपत्तीच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या नवीन फंडाला म्हणजे ‘पीएम-केअर’मागे आत्तापासूनच घोटाळ्याचा उद्देश असल्याचं म्हटलं आहे. काहींच्या मते नवीन फंड तयार करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की तो नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे आणि एकूण जमा झालेला निधी आणि खर्च झालेला निधी याबाबत कायदेशीर माहिती मिळणं अशक्य होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनासारखं राष्ट्रीय संकट देशावर कोसळलेलं असताना PM Cares या नावाने फंड सुरु करुन सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जवाहरलाल नेहरु यांनी जानेवारी १९४८ मध्ये राष्टीय सहाय्यता निधी अर्थात PM National Relief Fund स्थापन केला. त्यानंतर एकाही पंतप्रधानांनी नवा राष्ट्रीय निधी स्थापण्याची गरज वाटली नाही. मात्र PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

News English Summary:  Former Chief Minister and Congress leader Prithviraj Chavan has criticized that Prime Minister Narendra Modi did not miss the opportunity of self promotion by launching a fund in the name of PM Cares while the national crisis like Corona has collapsed on the country. He has criticized Prime Minister Narendra Modi by tweeting. Jawaharlal Nehru founded the National Assistance Fund, the PM National Relief Fund, in January 1948. After that, no Prime Minister felt the need to set up a new national fund. However, Chavan said in a tweet that Prime Minister Narendra Modi did not miss the opportunity of self promotion by launching PM Cares Fund.

 

News English Title: Story PM Cares Fund is a blatant attempt at self promotion of PM Narendra Modi says Prithviraj Chavan News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x