12 December 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोनाला घाबरू नका!....भारतातील १० रूग्ण ठणठणीत बरे झाले

Corona Virus in India

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. कोरोनामुळे जगभरात ५७३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना भारतात कोरोनामुळे १० रूग्ण एकदम ठणठणीत झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही आता ८४ पर्यंत पोहोचली आहे.

कोरोनाची लागण ज्या देशातून झाली त्या चीनच्या वुहानमधून २० वर्षीय तरूणी ३० जानेवारी रोजी केरळमध्ये आली. याच तरूणीमार्फत कोरोनाने भारतात प्रवेश केला. या तरूणीने स्वतः सतर्कता दाखवत आपल्या काही महत्वाच्या तपासण्या केल्या. यामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे आढळली. तसेच भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत झाला आहे.

२० फेब्रुवारीपर्यंत या तरूणीवर जिल्हा रूग्णालयात उपचार होते. तिला आयसोलेडेट विभागात ठेवण्यात आलं होतं. सुरूवातीला या तरूणीच्या कुटुंबियांसाठी अत्यंत धक्कादायक बाब होती. मात्र तरूणीने स्वतः त्यावर ठाम भूमिका घेतली. आणि ती भारतातील पहिला कोरोनामुक्त व्यक्ती ठरली.

दरम्यान, महाराष्ट्रात आणि दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या १९ वर गेली आहे. पुण्यातल्या रुग्णांची संख्या १० वर गेली असून नागपूरातही आणखी २ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पुण्यात ३११ जणांना देकरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

भारतात आतापर्यंत २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘कोरोना’चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता १०० देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

 

News English Summery: Worldwide, corona virus is widespread. The United States declared a national emergency because of Corona. Corona has killed 5,734 people worldwide. It is reported that 10 patients were diagnosed with coronas in India. In India, the number of coronary arteries has now reached 84. A 20-year-old woman from Wuhan, China, from the country from which Corona was infected, came to Kerala on January 30. It was through this young woman that Corona entered India. The young woman showed herself alertness and made some important checks. In this she noticed the symptoms of corona infection. The woman was treated at the district hospital till February 20. She was placed in the Isolate section. In the beginning it was a very shocking thing for the young woman’s family. But the young woman herself played a strong role on it. And she became India’s first corona free person.

 

News English Title: Story ten corona virus affected Patients cured in India.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x