13 December 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

अर्णब यांची जामीनावर सुटका | पण वृत्त दोषमुक्त झाल्यासारखं

Supreme court of India, Granted bail, Arnab Goswami

मुंबई, ११ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court of India) मोठा दिलासा मिळाला आहे. गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची लवकरच तळोजा कारागृहातून सुटका होईल.

विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या इतर दोन आरोपींना सुद्धा जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केलं.

सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना विचारलं की, अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांना पोलीस कोठडीच घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे का? चंद्रचूड यांनी विचारलं की, गोस्वामीवर पैसे थकवल्याचा आरोप आहे. तसेच कुणी आत्महत्या केलीय तर तो अपहरणाचा गुन्हा आहे का?

“तुम्हाला त्यांची विचारधारा आवडत नाही असं होऊ शकतं. माझ्यावर सोडा. मी त्यांची वाहिनी पाहत नाही. परंतु जर उच्च न्यायालय जामीन देत नाही तर त्या नागरिकाला तुरूंगात टाकलं जातं. आम्हाला एक कठोर संदेश द्यायला हवा. पीडित व्यक्तीला एका निष्पक्ष चौकशीचा अधिकार आहे. तपास सुरू राहू द्या. परंतु राज्य सरकारं या आधारावर व्यक्तींना लक्ष्य करत राहिली तर एक कठोर संदेश बाहेर जायला हवा,” असंही न्यायमूर्ती चंद्रचूड या म्हणाले.

 

News English Summary: Republic TV editor Arnab Goswami has received great relief from the Supreme Court of India in the Naik suicide case. Goswami has been granted bail by the Supreme Court. So he will be released from Taloja Jail soon. Apart from Arnab Goswami, two other accused in the case have also been granted bail. Goswami’s refusal to grant relief was a mistake of the Mumbai High Court, an important statement made by the Supreme Court during the hearing.

News English Title: Supreme court of India has granted bail to Arnab Goswami News updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x