26 April 2024 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अॅट्रॉसिटी कायद्याच्या आधीच्या निर्णयावर स्थगिती नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला चांगलीच दणका मिळाला आहे. संबंधित विषयातील सर्व पक्षकारांना केवळ ३ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून त्यावर दहा दिवसांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

केंद्र सरकारची कान उघडणी करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्टं केलं आहे की, अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नसून, केवळ अटक आणि सीआरपीसीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे. निर्दोष लोकांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचेही स्पष्ट केले. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होणार नाही तसेच एफआयआरची सुद्धा वाट पाहावी लागणार नाही. एकूणच केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील 20 मार्चच्या निर्णयावर दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. संबंधित विषयातील सर्व पक्षकारांना केवळ ३ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून त्यावर दहा दिवसांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x