14 December 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कायदेशीर नोटीसनंतर संजय राऊत नरमले | म्हणाले सुशांत आमचाच मुलगा होता

Sushant Singh Rajput, MP Sanjay Raut

मुंबई, १४ ऑगस्ट : शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या जग व्यापणाऱ्या संकटावरही त्यांच्याकडे उपाय असावा. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी ‘वादळी’ मुलाखत त्यांनी घेतली त्यात जागतिक आरोग्य संघटनाही कोरोनासंदर्भात आपला सल्ला घेईल, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारिफ केली होती. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजब वक्तव्य केलं आहे.

एकाबाजूला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता. तसेच या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबियांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं. असंही राऊत म्हणाले होते.

राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात एक विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यानंतर, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली. तसेच, माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर, राऊत यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. तसेच, सुशांत आमचाच मुलगा होता, असेही राऊत यांनी म्हटले.

“सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या!,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “दीड दमडीच्या भाजपाच्या बिहारमधल्या लोकांनी आमच्यावर शिंतोडे उडवले त्याला आम्ही किंमत देत नाही. हिटलरकडे एक गोबेल्स होता, भारतात १० हजार गोबेल्स आहेत. मी माझ्या लेखात जी भूमिका घेतली ती योग्य आहे. ते माझं कर्तव्य आहे. काही लोक सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक अजेंडा घेऊन चालले आहेत. मुंबई पोलिसांची प्रतीमा या लोकांनी मलीन केली,” असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

 

News English Summary: Shiv Sena leader Sanjay Raut said that former actor Sushant Singh Rajput was like ‘Mumbai’s son’ and the Maharashtra govt wants justice for his family. The Shiv Sena leader further said that the Mumbai Police is not lenient in the probe. Raut said that a CBI probe should be conducted if the Mumbai Police was not serious in the probe.

News English Title: Sushant Singh Rajput is like our son said MP Sanjay Raut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x