बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद स्वामी भारतातून पळाला अन थाटलं स्वतःच हिंदू राष्ट्र
नवी दिल्ली: बलात्काराच्या आरोपा नंतर देश सोडून गेलेला ‘स्वयंभू महाराज’ नित्यानंद आता एका देशाचा मालक झाला आहे. नित्यानंद जेव्हा देशापासून पळाला तेव्हापासून त्याचा शोध भारतातील पोलीस यंत्रणा घेत आहे. परंतु आता त्यांने एक देश बनविला आहे असं समोर आलं आहे. जगातील कोणत्या कोपऱ्यात नेमका लपला आहे हे अद्याप माहित नसलं तरी नित्यानंद यांनी संबंधित देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवले आहे.
२२ नोव्हेंबर रोजी गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या अहमदाबाद आश्रमात शोध मोहीम केली होती. मात्र तेथे काही विशेष वस्तू सापडल्या नव्हत्या. नित्यानंदने बनवलेल्या कैलासा देशाची “कैलासा.ऑर्ग” नावाने वेबसाइट देखील सुरु केली आहे. संबंधित वेबसाइटवर असे लिहिले आहे की, ‘कैलाशा हा एक देश आहे, जेथे हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नाहीत. हा देश त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी आपल्या देशात हिंदू होण्याचा हक्क गमावला आहे. ‘ इतकेच नाही तर अमेरिकेत कैलासा देशाची संकल्पना झाल्याचे वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे. सनातन हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी याची रचना केली गेली आहे. नित्यानंद यांचं या देशात स्वतःच सरकार आहे, ज्यात गृह विभाग असो की वित्त विभाग असो, अशी सर्वकाही तरतूद आहे.
वेबसाइटवर असे लिहिले आहे की त्यांचे ध्येय हिंदू धर्माचे रक्षण करणे आणि लोकांना मानवतेबद्दल जागरूक करणे आहे. या वेबसाइटवर महाराज नित्यानंद यांची प्रचंड स्तुती करण्यात आलेली आहे, ज्यात असे म्हटले आहे की कैलासा पुनरुज्जीवित करण्यासाठी नित्यानंद हे साधू झाले. गुजरात पोलिसांकडून नित्यानंद शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अजून तरी इंटरपोलशी संपर्क साधलेला नाही.
नित्यानंदांनी भारतातून पळून जाऊन हे हिंदू राष्ट्र थाटले आहे. विशेष म्हणजे नित्यानंद स्वामीचा स्वतःचा पासपोर्ट, ध्वज, शासकीय विभाग, शाळा, सर्वकाही इकडे असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासह हिंदु राष्ट्र, हिंदू धर्म आणि संबंधित अनेक गोष्टी वेबसाइटवर लाँच केल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे नित्यानंद महाराज यांच्यावर कर्नाटकात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे, तर गुजरातमध्ये बालकांच्या छळाशी संबंधित प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अनेकदा याच नित्यानंद महाराजांच्या आश्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून गेले आहेत.
News English Summary: Swayambhu Maharaj, who left the country after being accused of rape, has now become the owner of a country. The Indian police have been searching for Nityanand since he fled the country. But now it has come to light that they have made a country.
News English Title: swami nityanand rape accused in India own country kailaasa hindu rashtra News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News