29 March 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं | अन्यथा भाजपला ५० जागाही मिळाल्या नसत्या - ममता बॅनर्जी

West Bengal Assembly Election

कोलकत्ता, ०३ एप्रिल | ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला ७६ जागांवर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भारतीय जनता पक्षाला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

News English Summary: Mamata Banerjee’s Trinamool Congress got a very clear majority. The results of the five states were declared on Sunday, but the entire country was focused only on the battle of Churshi in West Bengal. As expected, the result was ‘played’ in Bengal. Out of the total 292 seats in the state, Trinamool Congress won 214 seats with a huge majority, while the BJP, which claimed to form the first saffron government in the state, had to settle for 76 seats.

News English Title: Trinamool Congress Mamata Banerjee made serious allegations on Election commission of India after West Bengal Assembly Election result 2021 news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x