29 March 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार की मोदी सरकारच्या ढासळलेल्या कामगिरीचं प्रतीक? | 12 मंत्र्यांना हटवलं

Union cabinet reshuffle

नवी दिल्ली, ०७ जुलै | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. आज एकूण 43 मंत्री शपथ घेतील. यापैकी 24 नवीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री होते. या अर्थाने 28 मंत्र्यांना सामिल होण्याची शक्यता होती. विद्यमान 11 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी 39 मंत्र्यांना सामिल करु शकतात. आज ज्या 43 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, त्यांच्यामध्ये काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाईल.

दुसरीकडे जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. असे मानले जाते की देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी विस्कळीत झालेली आरोग्य सेवा त्यांच्या राजीनाम्याचे कारण बनले.

शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौधरी, महिला व बालविकास मंत्री देवोश्री चौधरी, खते व रसायनमंत्री सदानंद गौडा, कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, डॉ. बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी आणि रतनलाल कटारिया यांचा राजीनामा देखील घेण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला. त्यांना कर्नाटकचे राज्यपाल केले गेले आहे. एकूण 11 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

कॅबिनेट विस्तारामध्ये अनेक राज्य मंत्र्यांना प्रोमोट केले जाऊ शकते. यामध्ये अनुराग ठाकूर, जीके रेड्डी, मनसुख मांडवया, किरन रिजिजू, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाल यांच्या नावांचा समावेश आहे.

या मंत्र्यांनी दिला राजीनामा:
रमेश पोखरियाल निशंक
संतोष गंगवार
देबोश्री चौधरी
संजय धोत्रे
बाबुल सुप्रियो
रावसाहेब दानवे-पाटील
सदानंद गौड़ा
रतन लाल कटारिया
प्रताप सारंगी
डॉ हर्षवर्धन
अश्विनी चौबे
थावरचंद गहलोत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union cabinet reshuffle 11 ministers resigned from cabinet including Ramesh Pokhriyal news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x