29 March 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार

India, Covid19, Corona Virus, ICMR

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.

भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. तर ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १४ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्‍य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्राल्याने म्हटल्या प्रमाणे, यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे, की “बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल क्लस्‍टर्स असू शकतात, जेथे अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकानांवरून लोक येत आहेत. झोपडपट्ट्या, जेल, वृद्धाश्रमांतदेखील हॉटस्‍पॉट असू शकतात. या शिवाय किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतरही काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात, असे भाग आणि अशा कोलांची तपासणी ICMR च्या गाइडलाइन्स प्रमाणे तसेच वेगाने होणे आवश्यक आहे.”

 

News English Summary: The central government says the risk of corona spreading is highest from those working in grocery stores and street vendors. Such people can infect a large number of people, the central health department said.

News English Title: Vegetable grocery shops and other vendors can be potential corona spreaders Center asks test them News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#ICMR(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x