24 June 2019 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

तुटपुंज्या कर्जामुळे बळीराजाच्या आत्महत्या; तर कर्जबुडव्या उद्योगपतींचा कुटुंबासोबत क्रिकेटचा आनंद

तुटपुंज्या कर्जामुळे बळीराजाच्या आत्महत्या; तर कर्जबुडव्या उद्योगपतींचा कुटुंबासोबत क्रिकेटचा आनंद

ओव्हल : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि देशातील बँकांना करोडोचा चुना लावून आणि गैरव्यवहार करुन इंग्लंडला पलायन केलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. सामना सुरु झाल्यावर विजय मल्ल्या स्टेडियमनमध्ये जाण्यासाठी हजर झाला. तेव्हा मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरलं.

दरम्यान लोकसभा निवडणुकीदरम्यान याच उद्योगपतीला भारतात लवकरच खेचून आणणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर बहुमताने मोदी सरकार पुन्हा स्थापन झाले तरी अजूनही विजय मल्ल्या लंडनमध्ये मौजमजा करत असल्याचंच यावरुन दिसून येत आहे. दरम्यान भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत.

दरम्यान, प्रसार माध्यमांन विचारले असता आपण मॅच पाहण्यासाठी आलो असल्याचे उत्तर देऊन माल्ल्याने तेथून स्टेडियममध्ये पळ काढला. भारतीय बॅकांचं ९ हजार कोटींचं कर्ज न फेडता माल्ला इंग्लंडला पळून गेला आहे. देशातील बळीराजा दुष्काळाने हैराण झालेला आहे, त्यात पिकाला हमीभाव नाही आणि कर्जाकडून पिकवलेल्या मालाला ना भाव आणि त्यात इतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान होत असल्याने आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे देशात सगळंच अवघड होऊन बसलं आहे अशी भावना व्यक्त होत आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Narendra Modi(860)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या