19 April 2024 5:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

ममता बॅनर्जी ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारणार; इतर विरोधी पक्षांनाही आवाहन

Narendra Modi, Mamta Banerjee, Loksabha Election 2019

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान त्यांनी ईव्हीएम विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी देशभरातील इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.

ममता यांनी ईव्हीएम मशीनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांचा तपास करण्यासाठी ‘फॅक्ट-फाइंडिंग’ समितीची स्थापन करण्याची गरज अत्यंत असल्याचं म्हटलं आहे. दंर्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी काल पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर गंभीर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

आम्हाला भारतात लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल’ असं ममता यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने २३ जागांचा दावा केला होता, पण त्यांनी लोकसभेच्या १८ जागा जिंकता आल्या. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण ४ टक्क्यांनी वाढलं असल्याचं दावा देखील ममतांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x