17 April 2024 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ | उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत सुद्धा वाढ

Yogi Adityanath, CM Uddhav Thackeray, Best Performing CM, Mood Of The Nation Poll

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा मान मिळवला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Mood Of The Nation Survey)

सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मतं सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मतं मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मतं मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.

इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ नावानं १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ग्रामीण व शहरी भागांतील लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यांना आपापल्या राज्यातील सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात असाच सर्व्हे करण्यात आला होता. त्याच्याशी तुलना करता उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून येतं. उद्धव चांगले काम करत असल्याचं मत ७ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has bagged the number one position as the best Chief Minister of the country. This is the conclusion of a joint survey by India Today and Karvi Insights. Mood Of The Nation Survey

News English Title: Yogi Adityanath Is Best Performing CM In India For Third Time In Row In Mood Of The Nation Poll News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)#YogiAdityanath(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x