13 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील
x

LIC Saral Pension | महागाईत महिना खर्च परवडणार नाहीत, चिंता नको; ही सरकारी योजना दरमहा पेन्शन देईल - Marathi News

Highlights:

  • LIC Saral Pension
  • ‘LIC सरल पेन्शन योजना’
  • कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
  • एकदाच गुंतवणूक करा
  • पेन्शनची रक्कम किती?
LIC Saral Pension

LIC Saral Pension | ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ एलआयसीची ही जाहिरात तुम्ही आतापर्यंत अनेकवेळा टीव्हीला पाहिली असेल. LIC अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या विमांचा प्लॅन दिला जातो. त्याचबरोबर एलआयसीच्या अनेक योजना देखील उपलब्ध आहेत. अनेक लोक जीवनाचा एलआयसी विमा काढतात.

‘LIC सरल पेन्शन योजना’
अशातच नोकरी करणारा व्यक्ती कधी ना कधी रिटायर होणारच. रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता प्रत्येकाला सतावते. वय जास्त असल्यामुळे बाहेर काम करू शकत नाही आणि वयोमानानुसार आपल्याला ते जमतही नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य अल्हाददायक जावं यासाठी एलआयसीमधील ‘LIC सरल पेन्शन योजना’ या स्कीम बद्दल तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. या योजनेमधून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. कारण की, ही योजना तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देण्याची शाश्वती देते.

या योजनेमध्ये तुम्ही एकाचवेळी पैसे गुंतवू शकता. असं केल्यास गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळते. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ तुम्ही स्वतंत्र किंवा पार्टनरबरोबर घेऊ शकता.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
40 ते 80 या वयोमर्यादेखालील कोणताही व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. निवृत्तीआधी आणि निवृत्तीनंतर देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. सोबतच पती-पत्नी एकत्र मिळून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

एकदाच गुंतवणूक करा :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतंही वार्षिक प्रीमियम भरावं लागणार नाही. तुम्ही एकसाथ पैसे भरून ॲन्यूइटी खरेदी करू शकता. तुम्हालाही पेन्शन आयुष्यभर सुरू राहणार. निवृत्तीनंतर तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पैसे येत राहणार. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये पैशांची रक्कम वाढत नाही. सुरुवातीलाच जी रक्कम हस्तांतरित केली जाते तेवढीच रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला आयुष्यभरासाठी मिळत राहणार.

पेन्शनची रक्कम किती?
कंपनीने खातेधारकांसाठी कोणतीही रक्कम निश्चित केली नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त जेवढी रक्कम जमा कराल तितकाच जास्त रिटर्न तुम्हाला मिळणार. समजा तुम्ही 42 वर्षांचे आहात आणि तुम्ही 30 लाखांची ॲन्यूइटी खरेदी केली आहे तर, सेवानिवृत्ती झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे 12 हजार 388 रुपये जमा होत राहतील. त्याचबरोबर पॉलिसी लाभार्थ्याचा अचानक मृत्यू झाला तर, त्याने नॉमिनी केलेल्या व्यक्तीला गुंतवणूक केलेली सर्व रक्कम दिली जाईल.

Latest Marathi News | LIC Saral Pension Scheme benefits 15 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#LIC Saral Pension(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x