29 March 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना झटका

US Congress, US House, US President Donald Trump

वॉशिंग्टन: सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कनिष्ठ सभागृह असलेले हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह मध्ये झालेल्या ऐतिहासिक मतदानाद्वारे महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. आता ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्यासाठी उच्च सभागृह असलेल्या सेनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातच सीनेटमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सीनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Web Title:  Big shock to US President Donald Trump majority of US House votes to impeach President Trump for abuse of power.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x