20 April 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या आकडेवारीवर अमेरिकन माध्यमांना शंका

BJP, PM Narendra Modi, Institutionalized Lies, Rahul Gandhi, Washington Post newspaper

नवी दिल्ली, १९ जुलै : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६ लाख ७७ हजार ४२३ जणांना कोरोनावर मात केलेली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे २६ हजार ८१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. देशात १८ जुलैपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ नमूण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील ३ लाख ५८ हजार १२७ नमूने काल तपासण्यात आले आहेत.

दरम्यान भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीवरून अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी देखील शंका व्यक्त केली आहे. राहुल गांधी नेमका याच मुद्यावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा असत्य सुद्धा अधिकृतपणे (सत्य) पसरवत आहे आणि यांची देशाला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून, त्यात भाजपा अधिकृतपणे खोटी माहिती पसरवत आहे, असा आरोप केला आहे. “भाजपा असत्यच अधिकृतपणे पसरवत आहे. करोना चाचण्या मर्यादित केल्या व मृतांचा आकडा चुकीचा सांगण्यात आला. जीडीपीसाठी नवी मूल्याकंन पद्धती लागू करण्यात आली. चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी माध्यमांना धमकावलं गेलं. पण, हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची जबर किंमत मोजावी लागेल,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

वॉशिग्टन पोस्टच्या बातमीमध्ये भारतातील स्थितीबाबत असं म्हटलं आहे की, भारतात करोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या कमी संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जेव्हा भारतातील रुग्णांची संख्या दहा लाख झाली, तेव्हा मृतांचा आकडा २५,००० इतका होता. मात्र, अमेरिकेत व ब्राझीलमध्ये करोना बाधितांची संख्या दहा लाख असताना मृतांचा आकडा ५०,००० हजार होता, असं अहवालात म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत दहा लाख लोक करोना संक्रमित झाले आहेत. त्याचबरोबर भारत अमेरिका व ब्राझील पाठोपाठ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

News English Summary: The Washington Post reports on the situation in India that the low number of deaths due to corona in India has been questioned. When the number of patients in India reached one million, the death toll was 25,000.

News English Title: BJP has Institutionalized Lies India Will Pay Price Rahul Gandhi Slam To Modi Government over claim of Washington Post newspaper article News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x