29 March 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’...जगाची उत्सुकता वाढली

US President Donald Trump, made a tweet, Corona vaccine, Covid 19 Vaccine

वॉशिंग्टन, १५ जुलै : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.

करोना लसी संदर्भात चांगली बातमी असा त्या टि्वटचा अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधला जात आहे. अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे.

दुसरीकडे, कोरोनावरील लसीबाबत उद्या, गुरुवारी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. अ‍ॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे आहेत. ही लस बनविणाऱ्या संशोधकांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, या लसीच्या चाचणीवेळी रुग्णांच्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे.

 

News English Summary: US President Donald Trump made an important tweet today regarding the corona vaccine. “Great news on vaccines,” he tweeted.

News English Title: US President Donald Trump made an important tweet today regarding the corona vaccine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x