20 April 2024 5:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अमेरिकेकडून चीनची जोरदार आर्थिक कोंडी, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले निर्बंध

US President Trump, China, Covid 19

वॉशिंग्टन, ३० मे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीन नेहमीच काही गोष्टी लपवत आला आहे. कोरोना विषयावर चीनकडून उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्यांना संपूर्ण जगासमोर उत्तर द्यावे लागेल. त्याचप्रमाणे ट्रम्प पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना पूर्णपणे चीनच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे नाते संपुष्टात आणत आहोत.

वर्षाला ४० मिलियन डॉलर इतकी कमी रक्कम देवूनही WHOवर चीनचे नियंणत्र आहे. डब्ल्यूएचओ चीनच्या नियंत्रणाखाली आहे तर अमेरिका वर्षाला ४५० मिलियन डॉलर्स देत आहे.ही रक्कम अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे. कोरोना थांबविण्यास डब्ल्यूएचओ सुरुवातीच्या टप्प्यात अपयशी ठरला, कारण आता सुधारणेची गरज आहे, म्हणूनच आज आम्ही डब्ल्यूएचओ बरोबरचे आपले संबंध संपवत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद वाढत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या काही नागरिकांवर अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसंच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या गुंतवणुकीच्या नियमदेखील अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनच्या विरोधात मोठी पावलं उचलण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक सादर करण्यात आलं होतं.

चीन सरकारच्या हाँगकाँगविरुद्धच्या नव्या निर्णयामुळे त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. हा हाँगकाँगमधील लोक, चीनमधील लोक आणि खरोखर जगातील लोकांसाठी ही एक शोकांतिका आहे, असे ट्रम्प म्हणालेत. चीनने आपल्या एक देश, दोन सिस्टिमच्या वादा आता एक देश, एक सिस्टिममध्ये बदलला आहे. यामुळे मी माझ्या प्रशासनाला निर्देश देत आहे की, हाँगकाँगला स्वतंत्र आणि विशेष दर्जा देणारे धोरण समाप्त करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देत आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Over the past few days, the dispute between the US and China over the corona virus has been on the rise. Meanwhile, US President Donald Trump announced a ban on some Chinese citizens from entering the US. It has also decided to tighten investment rules in the US from China.

News English Title: USA President Donald Trump refuses entry to some Chinese people in America White House News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x