30 April 2025 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News

Highlights:

  • EPF on Salary
  • कधीही पैसे काढू नका
  • जाणून घ्या पेन्शनचे नियम
  • 50000 च्या पगारावर मिळतील करोडो रुपये
EPF on Salary

EPF on Salary | गव्हर्मेंट सर्व्हन्ट असलेल्या व्यक्तींना पीएफच्या माध्यमातून रिटायरमेंटची काहीही चिंता नसते. परंतु प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटसाठी जमापुंजी खर्च करावी लागते. त्याचबरोबर निवृत्तीनंतर आयुष्य कसं जगायचं या विचाराने आधीच पैशांची काहीतरी गुंतवणूक करून ठेवावी लागते.

कोणी म्युचल फंडमध्ये पैसे गुंतवतं तर, कोणी वेगवेगळ्या सरकार योजनांमध्ये. परंतु प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ आहे. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघठन. ही योजना कर्मचाऱ्यांना रिटायर होईपर्यंत करोडो रुपये मिळवून देऊ शकते.

कधीही पैसे काढू नका :
तुमच्या खात्यामध्ये तेव्हाच करोड रुपये जमा होतील जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी होईपर्यंत एकही पैसा काढणार नाही. जर तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तर तुम्ही या अकाउंटमधून पैसे काढू शकता. त्याचबरोबर अकाउंटमधून पैसे काढल्यामुळे तुमची खात्यामधील रक्कम भरून काढण्यासाठी पगारामधून गुंतवणूक करायला हवी. तरच तुमचा तगडा बॅलेन्स जमा होईल.

जाणून घ्या पेन्शनचे नियम :
ईपीएफओ अंतर्गत कोणताही कर्मचारी दहा वर्ष काम केल्यानंतर म्हणजेच दहा वर्ष पीएफ खात्यात पैसे जमा केल्यानंतर पेन्शन मिळणे हा त्याचा मालकी हक्क असतो. एवढेच नाही जर तुम्ही नऊ वर्ष आणि सहा महिने काम केलं असेल तरीसुद्धा तुम्ही पेन्शनचे हक्कदार बनू शकता. या योजनेमध्ये 58 वर्षांपर्यंत पोहोचणारे कर्मचारी पेन्शनवर हक्क सांगू शकतात. दरम्यान कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये नियुक्ताकडून येणारे 8.33% ईपीएसमध्ये जातात तर, पीएफमध्ये 3.67% ईपीएफमध्ये येतात.

50000 च्या पगारावर मिळतील करोडो रुपये :
समजा तुमची बेसिक सॅलरी त्याचबरोबर DA मिळून 50,000 रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला 12% गुंतवणूक करताय आणि तुमचं वयवर्ष 30 आहे. तर, 8.1% च्या हिशोबाने प्रत्येक वर्षी तुमच्या पगारामध्ये 5%ने दरवाढ होते. तर, निवृत्तीपर्यंत तुमच्या खात्यात 2 करोड 53 लाख 46,997 एवढी अमाऊंट जमा होईल. मिळालेला पैशांमुळे तुम्ही तुमची रिटायरमेंटनंतरची लाईफ अगदी आनंदाने घालवू शकता. तुम्हाला कोणापुढे हात पसरण्याची अजिबात वेळ येणार नाही.

Latest Marathi News | EPF on Salary 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या