11 December 2024 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News

Highlights:

  • EPF Withdrawal
  • अटी आणि नियम :
  • ईपीएफ अकाउंट विथड्रॉ करण्याची पात्रता :
  • ईपीएफ स्टेटस कसा चेक कराल?
  • नोकरीवर असताना किती पैसे काढता येतात?
EPF Withdrawal

EPF Withdrawal | कर्मचारी भविष्य निधी संघठन म्हणजेच ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा प्रदान केल्या जातात. अशातच कर्मचाऱ्यांच्या पगारांचे दोन भागांमध्ये योगदान केले जाते. पहिला भाग म्हणजे ईपीएस आणि दुसरा ईपीएफ. ईपीएसमध्ये तुमच्या पगारातील 8.33% तर, ईपीएफमध्ये 3.67% अमाऊंट जमा केली जाते. यामध्ये तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये संपूर्ण 12% योगदान केले जाते आणि हे पैसे तुम्हाला रिटायरमेंटनंतर दिले जातात.

अटी आणि नियम :
ईपीएफओ तुम्हाला आर्थिक आणि महत्त्वाच्या खर्चासाठी रिटायरमेंट होण्याआधी देखील पैसे काढण्याची सुविधा प्रदान करते. समजा तुम्ही एखादी नोकरी सोडली किंवा तुम्हाला अचानकपणे नोकरीवरून काढून टाकलं तर, तुम्ही 60 दिवसांच्या कार्यकाळानंतर तुमचा संपूर्ण पीएफ फंड काढून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफ अकाउंटचा 9 नंबरचा फॉर्म भरून द्यावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही दुसरी कोणती नवीन कंपनी जॉईंट केली नसेल तरच तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल.

ईपीएफ अकाउंट विथड्रॉ करण्याची पात्रता :
* तुम्ही तुमची ईपीएफ अमाऊंट रिटायरमेंट होण्याआधी काढू शकत नाही. 100% म्हणजेच संपूर्ण अमाउंट रिटायरमेंट झाल्यानंतरच विथड्रॉ करता येते.
* तुम्ही बेरोजगारीचे जीवन जगत असाल तर, डिपॉझिट केलेली ईपीएफओची सर्व अमाऊंट तुम्ही काढू शकता.
* एवढेच नाही तर बेरोजगारीमध्ये तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातील 75% अमाऊंट काढून घेऊ शकता.

ईपीएफ स्टेटस कसा चेक कराल?
ईपीएफ स्टेटस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने चेक केले जाऊ शकते. त्यामध्ये तुम्ही उमंग ॲप, UAN पोर्टल आणि ईपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ईपीएफ स्टेटस चेक करू शकता.

नोकरीवर असताना किती पैसे काढता येतात?
समजा तुम्ही नोकरीवर आहात आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर, जमा केलेल्या रकमेतून तुम्ही 75% रक्कम काढून घेऊ शकता. दरम्यान ईपीएफओनुसार अमाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी 20 दिवसांची प्रोसेस लागू शकते. जर 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत असेल तर तुम्ही रीजनल पीएफ कमिशनरला संपर्क करू शकता किंवा ईपीएफओ वेबसाईटवर देखील तक्रार नोंदवू शकता.

Latest Marathi News | EPF Withdrawal Online Process 18 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Withdrawal(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x