13 December 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Gratuity Calculator | पगारदारांनो, 20 वर्ष नोकरी आणि 50,000 हजार पगार तर, एवढी मिळेल ग्रॅच्युईटी रक्कम - Marathi News

Highlights:

  • Gratuity Calculator
  • ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र :
  • 20 वर्ष कामाची आणि 50,000 पगार तर, ग्रॅच्युइटी रक्कम किती
  • प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही :
  • कॅल्क्युलेशन पहा :
  • ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत कंपनी रजिस्टर नसेल तर, होईल हा बदल :
  • नोकरीवर असताना कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर, ग्रॅच्युइटी रक्कम कोणाला मिळते :
Gratuity Calculator

Gratuity Calculator | एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या कामाचे 5 पेक्षा जास्त वर्ष कंपनीला दिले असतील तर त्या कर्मचाऱ्याला एका बक्षीसाच्या स्वरूपात कंपनीकडून ग्रॅच्युईटी रक्कम देण्यात येते. ही रक्कम कर्मचारी जेव्हा कंपनी सोडून निघून जातो त्यावेळेस त्याला ही रक्कम देण्यात येते. बक्षीस स्वरूपात किंवा एखाद्या रिवॉर्ड स्वरूपात देण्यात येणारी ग्रॅच्युईटी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या शेवटच्या दहा महिन्यांच्या पगारावर कॅल्कुलेट होते.

परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी रक्कम कशी मोजावी हेच ठाऊक नसतं. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र सांगणार आहोत. त्याचबरोबर इतरही काही गोष्टींची माहिती देणार आहोत. चला पाहूया.

ग्रॅच्युईटी मोजण्याचे सूत्र :
तुम्ही तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युईटी एका सूत्राच्या सहाय्याने अगदी सहजरीत्या मोजू शकता. त्यामध्ये तुम्हाला जास्त गणिती करावी लागणार नाहीये. तर, हे सूत्र (शेवटचा पगार)×(कंपनीला दिलेल्या योगदानाच्या कामाची वर्ष संख्या)×(15/26). हे सूत्र वापरूनच तुम्हाला तुमची ग्रॅच्युईटी रक्कम काढायची आहे. महिन्यातील चार दिवस हे रविवारचे दिवस असतात. त्यामुळे ते मोजले जात नाहीत आणि म्हणूनच एका महिन्या 26 दिवस गृहीत धरले जातात. सोबतच 15 दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युईटीची कॅल्क्युलेशन केली जाते. समजा या सूत्राप्रमाणे तुम्ही कंपनीला एकूण 20 वर्ष कामाचे योगदान दिले असेल आणि तुम्हाला शेवटचा पगार 50,000 हजार रुपयांइतका असेल तर, तुम्हाला किती ग्रॅच्युईटी रक्कम मिळेल. पाहूया.

20 वर्ष कामाची आणि 50,000 पगार तर, ग्रॅच्युइटी रक्कम किती

* नोकरीचे वर्ष : 20
* कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार : 50 हजार रुपये
* बेसिक सॅलरी × नोकरीचे वर्ष : 50,000 × 20 = 10,00,000
* (बेसिक सॅलरी) × (नोकरी वर्ष) × (15/26) = 5,76,932 म्हणजेच एकूण 5.76 लाख रुपये.

प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही :
अशा पद्धतीने सूत्राचा वापर करून तुम्ही अगदी सहज रित्या तुमच्या बेसिक सॅलरीनुसार ग्रॅच्युईटी रक्कम मोजू शकता. परंतु तुम्ही एका गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून महागाई भत्ता, कमिशन यांसारखा लाभ मिळतो. परंतु प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मूळ वेतनातील बेसिक सॅलरीनुसारच ग्रॅच्युईटी रक्कम मोजावी लागते. समजा 50,000 हजार पगारातील बेसिक सॅलरी 25,000 रुपये असेल तर, ग्रॅच्युईटीची रक्क कशी मोजणार.

कॅल्क्युलेशन पहा :
समजा कर्मचाऱ्याने 20 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये काम केलं असेल आणि त्याची बेसिकच सॅलरी 25,000 हजार रुपये एवढी असेल तर, 25,000×20=5,00,000. रुपये होतात. त्याचबरोबर (बेसिक सॅलरी×नोकरी वर्ष)×(15/26) : 5,00,000×15/26=2,88,461.53 या कॅल्क्युलेशनप्रमाणे कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीवरून त्याला एवढी ग्रॅच्युईटी रक्कम मिळेल.

ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत कंपनी रजिस्टर नसेल तर, होईल हा बदल :
समजा तुम्ही एखाद्या रजिस्टर नसलेल्या कंपनीमध्ये काम करत असाल. म्हणजेच जी कंपनी ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत येत नसेल अशा कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एका वेगळ्या कॅल्क्युलेशननुसार ग्रॅच्युइटी रक्कम प्रदान करतात. ही रक्कम बेसिक सॅलरीच्या निम्मी रक्कम पकडली जाते. त्याचबरोबर कंपनी रजिस्टर नसेल तर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटी द्यायची का नाही हा सर्वस्वी निर्णय कंपनीचा असतो.

नोकरीवर असताना कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर, ग्रॅच्युइटी रक्कम कोणाला मिळते :
एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला किंवा रिटायरमेंट होण्याआधी आणि जॉब सोडण्याआधीच कर्मचारी मृत्युमुखी पडला तर, कर्मचाऱ्यांच्या नॉमिनीला कंपनीकडून पेमेंट करावे लागते. अशा परिस्थितीत कमीत कमी वेळेचा नियम लागू नाही होत.

Latest Marathi News | Gratuity Calculator for salary 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity Calculator(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x