19 July 2019 10:01 AM
अँप डाउनलोड

खेड: नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक; जगबुडी नदीवरील नवीन पुलावर इंजिनिअर्सना बांधलं होतं

खेड: नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक; जगबुडी नदीवरील नवीन पुलावर इंजिनिअर्सना बांधलं होतं

खेड : मुंबई गोवा हायवे संबंधित कामचुकारपणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना आजच जमीन मंजूर झाला आहे. मात्र आता खेडमधील जगबुडी नदीवरील नवीन पुलावर आर.के. बामणे आणि प्रकाश गायकवाड या इंजिनिअर्सना पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दापोली उप कारागृहाच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रसार माध्यमांनी वैभव खेडेकर यांना या कारवाईविषयी विचारले असता, जनतेच्या हितासाठी काम करत असताना असे १०० गुन्हे देखील आम्ही अंगावर घेऊ असे वैभव खेडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि दापोली नगर पंचायतीचे माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी सरकार ३५३ कलमाचा गैरवापर करत असल्याचा आणि दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे सध्या खेडमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं समजतं. पुढे पक्षाकडून कोणती प्रतिक्रिया येते हे देखील पाहावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(348)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या