23 September 2019 11:10 AM
अँप डाउनलोड

पनवेल: मनसे कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक

MNS, BJP, Raj Thackeray

मुंबई : पनवेल मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी त्यांच्या ७ ते ८ गुंड साथीदारांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली आहे. मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण प्रकरणी कामोठे पोलीस स्थानक इथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. परंतु राजकीय दबावाखाली तपास सुरू आहे असे दिसताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली. गुन्हे शाखेकडे प्रकरण गेल्यानंतर तपासाला वेग आला.

विजय चिपळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी अलिबाग कोर्टात पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज केला मात्र अलिबाग कोर्टाने फेटाळला. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुण्याला पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे यांना नवी मुंबई युनिट ३ च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मध्य रात्री अटक केली आहे. आता पुढील आरोपींचा शोध सुरू असून त्यांना ही लवकरच अटक केली जाणार आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(405)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या