13 December 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत

Udhav Thackeray, Shivsena, Vinayak Raut, Narayan Rane, Nitesh rane, Nilesh Rane

रत्नागिरी : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.

भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी सुमारे २,५०० कामगारांना देशोधडीला लावले असा आरोप स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार डॉक्टर तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. खंबाटा बंद झाल्याने त्या रोजगारावर अवलंबून असलेले तब्बल ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे.

ही कंपनी २०१६ साली बंद झाली त्या मागील खरे सूत्रधार विनायक राऊत आहेत, असा आरोप यापूर्वीच खंबाटातील कामगारांनी केला होता. आज दुपारी २ वाजता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांबरोबर रत्नागिरीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेणार असून, नेमके काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंजली दमानिया यांच्या रत्नागिरीत येण्यामुळे शिवसेनेनेत खळबळ उडाली असून बदनामीमुळे शिवसेना घाबरली आहे.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x