25 April 2024 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

नाणार जाहिरात: जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही: निलेश राणे

BJP leader former MP Nilesh Rane, Shivsena, CM Uddhav Thackeray, Nanar Refinery Project

मुंबई: सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा जाहिरातमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैशासाठी हे लोकं विकले जातात हे आम्ही वारंवार सांगतो. नाणार रिफायनरीला तीव्र विरोध केला, तरुण व माता-भगिनीनी आंदोलन करत केसेस अंगावर घेतल्या पण नेहमीप्रमाणे यु टर्न घेत ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्यांच्याशीच परत गद्दारी केली. जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात आघाडी उघडत मते मिळवणाऱ्या शिवसेनेची नाणारवरून कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामनात’च नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातच ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या जाहिरातीमुळे शिवसेना स्वतःच स्वतःच्या सापळ्यात अडकली आहे.

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मतेही मिळविली होती. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन शिवसेनेने दिलं होतं. मात्र आता राज्यात आघाडी सरकारमध्ये सामिल होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे.

नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं जाहिरातीत केला आहे. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता.

 

Web Title: Story BJP leader former MP Nilesh Rane has criticized Shivsena over Nanar Refinery Project.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x