24 April 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी: मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Elgar Parishad, Koregaon Bhima

सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमाचा नाही, असं सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.

एल्गार आणि कोरेगाव भीमा या प्रकरणावरुन असलेल्या संभ्रमावर मुख्यमंत्री म्हणाले की, “एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा विषय कोरेगाव भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणार नाही. कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title: Story CM Uddhav Thackeray, Elgar Parishad, Koregaon Bhima.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x